लग्नानंतर ची गोष्ट

 सासरी मान कमी नाही होणार

माहेरी तुझा अभिमान वाटणार

नंदेला मैत्रीण बनवून बघ

मनातलं थोडं बोलून बघ

यान सासरी मान कमी नाही होणार

माहेरी तुझा अभिमान वाटणार

दिराला भाऊ बनवून बघ

आल्यावर जेवून घ्या भावजी बोलून बघ

यान सासरी मान कमी नाही होणार

माहेरी तुझा अभिमान वाटणार

सासूला आई बोलवून बघ

प्रेमान मायेने विचारून बघ

यान सासरी मान कमी नाही होणार

माहेरी तुझा अभिमान वाटणार

सासर्याना बाबा बोलून बघ

हक्कान त्यांच्या मनात ऐकून बघ 

यान सासरी  मान कमी नाही होणार

माहेरी तुझा अभिमान वाटणार

नवर्याला जिवलग मित्र बनवून बघ

प्रत्येक गोष्ट सांगून बघ

यान सासरी मान कमी नाही होणार

माहेरी तुझा अभिमान वाटणार 

हे सर्व करताना येतील अडचणी बर्याच 

पण हसून सामोरे जाऊन बघ

रूसवे फूगवे होतील घरात

पण या‌ सर्वांच्या सोबतचे आनंदाचे क्षण आठवून बघ

यान तुझा राग निवळेल मिनिटांत

तुझ्या घरात सुख समृद्धी नांदेल आनंदात

यान सासरी मान कमी नाही होणार

माहेरी तुझा अभिमान आहे



आवडली तर like share comment जरूर करा






लग्नानंतर ची गोष्ट

 सासरी मान कमी नाही होणार माहेरी तुझा अभिमान वाटणार नंदेला मैत्रीण बनवून बघ मनातलं थोडं बोलून बघ यान सासरी मान कमी नाही होणार माहेरी तुझा अभ...