लग्नानंतर ची गोष्ट

 सासरी मान कमी नाही होणार

माहेरी तुझा अभिमान वाटणार

नंदेला मैत्रीण बनवून बघ

मनातलं थोडं बोलून बघ

यान सासरी मान कमी नाही होणार

माहेरी तुझा अभिमान वाटणार

दिराला भाऊ बनवून बघ

आल्यावर जेवून घ्या भावजी बोलून बघ

यान सासरी मान कमी नाही होणार

माहेरी तुझा अभिमान वाटणार

सासूला आई बोलवून बघ

प्रेमान मायेने विचारून बघ

यान सासरी मान कमी नाही होणार

माहेरी तुझा अभिमान वाटणार

सासर्याना बाबा बोलून बघ

हक्कान त्यांच्या मनात ऐकून बघ 

यान सासरी  मान कमी नाही होणार

माहेरी तुझा अभिमान वाटणार

नवर्याला जिवलग मित्र बनवून बघ

प्रत्येक गोष्ट सांगून बघ

यान सासरी मान कमी नाही होणार

माहेरी तुझा अभिमान वाटणार 

हे सर्व करताना येतील अडचणी बर्याच 

पण हसून सामोरे जाऊन बघ

रूसवे फूगवे होतील घरात

पण या‌ सर्वांच्या सोबतचे आनंदाचे क्षण आठवून बघ

यान तुझा राग निवळेल मिनिटांत

तुझ्या घरात सुख समृद्धी नांदेल आनंदात

यान सासरी मान कमी नाही होणार

माहेरी तुझा अभिमान आहे



आवडली तर like share comment जरूर करा






जगण्याचा मंत्र

दुसऱ्या कडून स्वतासाठी अपेक्षा ठेवण्यापेक्षा
स्वता दुसऱ्या साठी काहीतरी करण्याची इच्छा ठेवा
मग बघा आयुष्य खूप सुंदर होईल मन शांत होईल

जेव्हा आपण दुसऱ्यासाठी आपली झोप तहान भूक
विसरून काम करतो तेव्हा आपलं जगणं
सार्थक होईल आणि सत्कामी लागेल


एकमेकांना मदत करा काळजी घ्या खुश रहा
एकटं चालण्यापेक्षा सर्वाना सोबत घेवून चालणं
कधीही चांगले असतं


हाच आहे जगण्याचा मंत्र 

जीवनाचं रहस्य

 जन्माला आला आहेस
 थोड जगून बघ
  जीवनात दुःख आहे
 थोडं सोसून बघ
 यशाची चव चाखताना
अपयश येत निरखून बघ
डाव मांडने सोपं असतं
थोडं खेळून बघ
घरटं बांधायचं सोपं असतं
थोडी मेहनत करून बघ
जगणं कठीण मरण सोपं असतं
यातील वेदना झेलून बघ
जगण मरण एक कोड असतं
एवढ एकदा सोडवून बघ 

आयुष्य जगताना

       देवाने माणसाची शरीर रचना अशी केलेली आहे 
       की माणूस स्वताची पाठ थोपटू शकतं नाही आणि 
        स्वताला लाथ मारू शकत नाही म्हणून आयुष्यात 
         हितचिंतकाची व निंदकाची गरज असते
      
       आयुष्यात असे लोक जोडा ,,जे वेळ येइल तेव्हा 
         तुमची सावली व आरसा बनतील
       कारण आरसा कधी खोटे बोलत नाही 
          व सावली कधी साथ सोडत नाही
      
        आयुष्यात असे लोक जोडा,,जे चांगल्या                         प्रसंगी तुमच्या पाठीमागे असतील
        तर वाईट प्रसंगी तुमच्या पुढे असतील
     
          आयुष्यात असे लोक जोडा,,जे तुमच्या चांगल्या.              कामासाठी तुमची पाठ थोपटतील 
            व वाईट कामासाठी तुमच्या गालात मारुन 
           तुम्हाला सरळ मार्ग वर आणतील 
        
      

            Plz  like and share 

Happy आयुष्य

विझलो आज जरी मी  
 हा माझा अंत नाही
पेटेन उद्या नव्याने
   हे सामर्थ्य नाशवंत नाही
छाटले जरी पंख माझे 
  पुन्हा उडेन मी
अडवू शकेल मला 
  अजून अशी भिंत नाही
माझी झोपडी जाळण्याचे
  केलेत कैक कावे
जळेल झोपडी अशी 
  आग ज्वलंत नाही
रोखण्यास वाट माझी
  वादळे आतूर होती 
डोळ्यात जरी गेली धुळ 
  थांबल्यास उसंत नाही
येतील वादळे खेपेला तुफान
   तरी वाट चालतो 
अडथळ्यांना भिऊन पडल
पावलांना आवडतं नाही

आयुष्य म्हणजे काय असते ,,,,,,,,,,,,,,,,

   जे मिळालं नाही ते मिळवायचे असते
    आयुष्य म्हणजे अनुभवाचे जाळे असते
   शिकून पुढे जायचे असते कारण
  सगळच मिळवणे हे जीवनसार नसत

    ज्या त्या वेळेवर मिळतील गोष्टी
     याच भान ठेवायचे असते
     आपली वेळ येइल या
    समाधानावर जगायच असत
     
       एकाच गोष्टीवर आयुष्याच
      सुख मानायचे नसत
       तलावासारख साचून राहायचं नसते
       नदीसारख वाहायची असत
           
         हसत्या चेह-यावर लपवून दुःख
        ओली पापणी मिटवायची असते
         दुसऱ्याच्या सुखाला आपलं
        हस्य बनवायचे असते
         
          वेळ जाऊ देण्याची ताकद अंगात भिनवायची असते
         आपल सुख आनंदाश्रुत बाहेर पाडायचं असत
          कारण दुःख विसरून पुढे जायचं असतं
          आणि आयुष्यात जगायच असत

आयुष्य

    ‌‌‌ आयुष्य

आयुष्यात जर एखादी गोष्ट सुटणारी नसेल तर tentionघेऊ नये
 आणि  जर सुटणारी असेल तर tention घ्यायचे कारण नाही
आपली चूक असेल तर रागवायचा अधिकार नाही आणि   
आपली चूक नसेल तर रागवायचे कारण नाही
आयुष्य खूप सुंदर आहे

लग्नानंतर ची गोष्ट

 सासरी मान कमी नाही होणार माहेरी तुझा अभिमान वाटणार नंदेला मैत्रीण बनवून बघ मनातलं थोडं बोलून बघ यान सासरी मान कमी नाही होणार माहेरी तुझा अभ...