Happy आयुष्य

विझलो आज जरी मी  
 हा माझा अंत नाही
पेटेन उद्या नव्याने
   हे सामर्थ्य नाशवंत नाही
छाटले जरी पंख माझे 
  पुन्हा उडेन मी
अडवू शकेल मला 
  अजून अशी भिंत नाही
माझी झोपडी जाळण्याचे
  केलेत कैक कावे
जळेल झोपडी अशी 
  आग ज्वलंत नाही
रोखण्यास वाट माझी
  वादळे आतूर होती 
डोळ्यात जरी गेली धुळ 
  थांबल्यास उसंत नाही
येतील वादळे खेपेला तुफान
   तरी वाट चालतो 
अडथळ्यांना भिऊन पडल
पावलांना आवडतं नाही

No comments:

Post a Comment

लग्नानंतर ची गोष्ट

 सासरी मान कमी नाही होणार माहेरी तुझा अभिमान वाटणार नंदेला मैत्रीण बनवून बघ मनातलं थोडं बोलून बघ यान सासरी मान कमी नाही होणार माहेरी तुझा अभ...