आयुष्य म्हणजे काय असते ,,,,,,,,,,,,,,,,

   जे मिळालं नाही ते मिळवायचे असते
    आयुष्य म्हणजे अनुभवाचे जाळे असते
   शिकून पुढे जायचे असते कारण
  सगळच मिळवणे हे जीवनसार नसत

    ज्या त्या वेळेवर मिळतील गोष्टी
     याच भान ठेवायचे असते
     आपली वेळ येइल या
    समाधानावर जगायच असत
     
       एकाच गोष्टीवर आयुष्याच
      सुख मानायचे नसत
       तलावासारख साचून राहायचं नसते
       नदीसारख वाहायची असत
           
         हसत्या चेह-यावर लपवून दुःख
        ओली पापणी मिटवायची असते
         दुसऱ्याच्या सुखाला आपलं
        हस्य बनवायचे असते
         
          वेळ जाऊ देण्याची ताकद अंगात भिनवायची असते
         आपल सुख आनंदाश्रुत बाहेर पाडायचं असत
          कारण दुःख विसरून पुढे जायचं असतं
          आणि आयुष्यात जगायच असत

1 comment:

  1. खूप छान ! मी ही लिहिले आहे या विषयावर
    https://www.jeevanekprawas.blogspot.com
    नक्की वाचा.

    ReplyDelete

लग्नानंतर ची गोष्ट

 सासरी मान कमी नाही होणार माहेरी तुझा अभिमान वाटणार नंदेला मैत्रीण बनवून बघ मनातलं थोडं बोलून बघ यान सासरी मान कमी नाही होणार माहेरी तुझा अभ...